Kredity
PERFORMING ARTISTS
Suresh Wadkar
Performer
Sadhana Sargam
Performer
COMPOSITION & LYRICS
Raju
Composer
Mahendra
Composer
Mahendra Kapoor
Composer
Dinesh Bawara
Lyrics
Texty
लाल होरी आयी र, लालेरा खेतमां ।
छुनछुन पायलिया बाजे र पैर मां ॥
छंद ओठातले, गीत गाती नवे
गारवा या नव्या पालवीला ।
हात हातातले सोडवेना सये
गच्च आकाश भेटे भुईला ॥
छंद ओठातले, गीत गाती नवे
गारवा या नव्या पालवीला ।
या वसंतातला सृष्टीचा सोहळा
बिलगुनी गंध रानावनाला ।
गौर लजवंतीचा केतकीचा मळा
पुष्कळा आज तू सोबतीला ॥
छंद ओठातले, गीत गाती नवे
गारवा या नव्या पालवीला ।
संथ वाहे झरा दूरच्या डोंगरा
गर्द झाडीतले रंग ओले ।
बिल्वरांचे तुझ्या गीत झंकारता
मोर डोळ्यातले लाजलेले ॥
छंद ओठातले, गीत गाती नवे
गारवा या नव्या पालवीला ।
चोळी ऐन्यातली नेसली इरकली
आज भरदार शिणगार ल्याली ।
माळतांना फुले सैल केसातले
सोडवेना मिठी... घट्ट झाली ॥
छंद ओठातले, गीत गाती नवे
गारवा या नव्या पालवीला ।
हात हातातले सोडवेना सये
गच्च आकाश भेटे भुईला ॥
लाल होरी आयी र, लालेरा खेतमां ।
छुनछुन पायलिया बाजे र पैर मां ॥
Written by: Dinesh Bawara, Mahendra, Mahendra Kapoor, Raju