Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Sulochana Chavan
Sulochana Chavan
Performer
COMPOSITION & LYRICS
Yadav Rao Rokade
Yadav Rao Rokade
Songwriter

Lyrics

खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
आम्ही तरण्या गं पोरी, जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी, उडविली ती पिचकारी
घातला गं घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
झणी पाऊल अवघडलं आणि काळीज धडधडलं
काय सांगू मी पुढलं? क्षणातच सार घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
मला काही समजना, मला काही उमजना
त्याला कोणी सांगना, कुणाला तो लाजना
डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
Written by: Vitlal Shinde, Yadav Rao Rokade
instagramSharePathic_arrow_out

Loading...