गाने
देवाने दिधली लोचने तुला पाहण्या
देवाने दिधली लोचने तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या, तुला वाहण्या
देवाने दिधली लोचने तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या, तुला वाहण्या
मूर्ती दिसे तुझी, वीणा वाजते रे कानी
मूर्ती दिसे तुझी, वीणा वाजते रे कानी
जशी भास्कराची वाट पाहते रजनी
जशी भास्कराची वाट पाहते रजनी
पहाटेस या सांगून बघना जरा थांबण्या
हृदयावरती नाम तुझे मी कधीच कोरले
मेहंदीच्या गंधात भारले भेटीचे सोहळे, भेटीचे सोहळे
अवघड वाटे आता जरा ही लाज राखण्या, लाज राखण्या
देवाने दिधली लोचने तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या, तुला वाहण्या
देवाने दिधली लोचने तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या, तुला वाहण्या
Written by: Gandhaar Gandhaar, Gandhaar Sangoram, Kshitij Patwardhan