Lirik
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेती-नेती शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीता हरली भवचिंता
जय देव, जय देव
(जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता)
(आरती ओवाळीता हरली भवचिंता)
(जय देव, जय देव)
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैची कळेल ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म-मरणाचा पुरलासे अंत
जय देव, जय देव
(जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता)
(आरती ओवाळीता हरली भवचिंता)
(जय देव, जय देव)
दत्त येऊनिया ऊभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला
जन्म-मरणाचा फेरा चुकविला
जय देव, जय देव
(जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता)
(आरती ओवाळीता हरली भवचिंता)
(जय देव, जय देव)
दत्त-दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी-तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान
जय देव, जय देव
(जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता)
(आरती ओवाळीता हरली भवचिंता)
(जय देव, जय देव)
Written by: Anuradha Paudwal