歌詞
[Chorus]
आस तू, भास तू, ताल तू खुलल्या श्वासांचा
रात तू, प्रीत तू, अर्थ तू मिटल्या ओठांचा
पडसाद ओठी श्वासांचे, श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे हे अर्थ स्पर्शाचे
[Chorus]
आस तू, भास तू, ताल तू खुलल्या श्वासांचा
रात तू, प्रीत तू, अर्थ तू मिटल्या ओठांचा
पडसाद ओठी श्वासांचे श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे हे अर्थ स्पर्शाचे, हो
[Verse 1]
अंतरी बेभान चांदण्यांची रात का?
सांगते भिजलेल्या पापण्यांचे गुज का?
काहूर उठते मनी का, रंग गालास का?
चिंब अंगावरी का शहारा? जीव होई जणू काजवा
पडसाद स्पर्शात मौनाचे, मौनात श्वासांचे
श्वासात रुजती अर्थ नवे अलवार ओठांचे
[Chorus]
आस तू भास तू
ताल तू खुलल्या श्वासांचा
रात तू प्रीत तू
अर्थ तू मिटल्या ओठांचा
Written by: Rishikesh Kamerkar, Rishikesh Kamerkar, Kshitij Patwardhan, Sameer Vidwans

