Lyrics
तुझी आभाळा इतकी माया
तू ममतेची गं छाया
तुझी आभाळा इतकी माया
तू ममतेची गं छाया
साधी-भोळी माझी आई
सुखाची गं तू साऊली
साधी-भोळी माझी आई
सुखाची गं तू साऊली
जीव ओवाळून लावी
माझी गं तू लाडूबाई
जीव ओवाळून लावी
माझी लाडूबाई
आईविना मला करमत नाही
आईविना मला करमत नाही
आईविना मला करमत नाही
चिऊ-काऊचा घास भरवते
निजताना मला अंगाई गाते
लाडी-गोडीनं सांभाळते माझी आई
कुशीत घेऊन गोंजारते माझी आई
तूच आहे माझ्या जीवनाची रखुमाई
माझी रखुमाई
आईविना मला करमत नाही
आईविना मला करमत नाही
करमत नाही
देवाचं वरदान आहे गं तू
अनमोल जीवदान दिलस तू
देवाचं वरदान आहे गं तू
अनमोल जीवदान दिलस तू
कसे हे उण फेडू गं, माझे आई?
आईविना मला करमत नाही
Written by: Pravin Koli, Yogita Koli