Music Video

Music Video

Lyrics

[Chorus]
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
घाली, साद तुला मन घाली
तू ना जरी भवताली रे
सुचव ना तूच उपाय आता
[Verse 1]
तू नार, सखे, सुकुमार
नजरेत तुझ्या तलवार
तू सांग कसा ईजणार? हे जी!
तू सांग कसा ईजणार?
उरीचा धगधगता वणवा
[Chorus]
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
[Verse 2]
किती वसंत मनात उमलुन आले
आणिक दरवळले
कधी तुझ्याच सुरात हरवून गेले
काहीच ना कळले
वाजती पैंजणेही मुक्या स्पंदनी
दाटते प्रीत ह्या गुंतल्या लोचनी
ही साद तुझ्या हृदयाची
हलकीच उरी प्रणयाची
हुरहूर मनी मिलनाची, हे जी!
हुरहूर मनी मिलनाची
दे सखे, कौल आता उजवा
झाली रुणझुण ही भवताली
लाज अनावर झाली रे
सुखाला साज नवा चढला
Written by: Ajay-Atul, Guru Thakur
instagramSharePathic_arrow_out

Loading...