Music Video

Music Video

Lyrics

कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करे काम
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
एक-एक तारी हाती, भक्त गाई गीत
एक-एक धागा जोडी, धागा जोडी
जानकीचा नाथं, जानकीचा नाथं
राजा घनश्याम
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
दास राम नामी रंगे, राम होई दास
एक-एक धागा गुंते, धागा गुंते
रूप ये पटास, रूप ये पटास
राजा घनश्याम
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
विणुन सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी-ठायी शेल्यावरती, शेल्यावरती
दिसे राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम
दिसे राम नाम...
लुप्त होई राम
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर
पाहि जो कबीर
विणुनिया शेला गेला सखा रघुवीर
सखा रघुवीर
कुठे म्हणे राम? कुठे म्हणे राम?
कुठे म्हणे राम?
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
Written by: G.D. Madgulkar, P. L. Deshpande
instagramSharePathic_arrow_out

Loading...