Lyrics

स्वामी
स्वामी माझे दत्त दिगंबर गुरु माउली स्वामी औदुम्बर
तुम्हीच देवा धरती अंबर तुमची सेवा घडो निरंतर
स्वामी मुळेच आहे माझ्या जीवनाला अर्थ
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
का सांगू मी चिंता माझी तुम्हा सर्व जाण
संकटात ओठी माझ्या स्वामी एक नाम
शरण आलो मी द्यावा चरणाशी ठाव
तुम्हा पायी तरली माझ्या जीवनाची नाव
गुरुचरित्र करता पारायण जीवन होई सार्थ
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी गाय जाहले मी झाले वासरू
स्वामी माय जाहले मी झाले लेकरू
स्वामी मार्ग जाहला मी वाटसरू
स्वामी अगाध किमया स्वामी कल्पतरू
स्वामी माझा पाठीराखा देई बल-सामर्थ्य
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Written by: Ganesh Bagul
instagramSharePathic_arrow_out

Loading...