Music Video
Music Video
Credits
PERFORMING ARTISTS
Praniket Khune
Lead Vocals
Sandhya Keshe
Lead Vocals
LK Laxmikant
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Praniket Khune
Songwriter
Sandhya Keshe
Songwriter
Lyrics
लय गुणाची हाय, पण कुणाची हाय?
सांगा कुणाची हाय ही पोरं?
लय गुणाची हाय, पण कुणाची हाय?
सांगा कुणाची हाय ही पोरं?
हिच्या मागं-मागं लागून
माझ्या जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं-मागं लागून
जीवाला लागलाय घोर
पायात रुणुझुणु पैंजण हिच्या
कानात फुलावानी डूलं
वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि
लाल-लाल गुलाबाचं फुलं
Hey, पायात रुणुझुणु पैंजण हिच्या
कानात फुलावानी डूलं
वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि
लाल-लाल गुलाबाचं फुलं
लय नखऱ्याची हाय, झुळूक वाऱ्याची हाय
झुळूक वाऱ्याची हाय ही पोरं
हिच्या मागं-मागं लागून
माझ्या जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं-मागं लागून
जीवाला लागलाय घोर
किर-किर रात, मन माझं हे गात त्यात
काकणाचा किणकिण आवाज, ओ
आजवर ध्यास जिचा होता उरी
हसून पाहिलं हो तिनं आज
किर-किर रात, मन माझं हे गात त्यात
काकणाचा किणकिण आवाज
आजवर ध्यास जिचा होता उरी
हसून पाहिलं तिनं आज
जरा चिडकीच हाय, पण भारीच हाय
आरं, भारीच हाय ही पोरं
हिच्या मागं-मागं लागून
माझ्या जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं-मागं लागून
जीवाला लागलाय घोर
बाप खासदार, भाऊ आमदार हिचा
माझं काय शेतावरती ऱ्हाहण
हीच्या घरी मऊमऊ बिछाना
माझं भुईवर तसंच पडणं
बाप खासदार, भाऊ आमदार हिचा
माझं काय शेतावरती ऱ्हाहण
हीच्या घरी मऊमऊ बिछाना
माझं भुईवर तसंच पडणं
लेक त्या घरची हाय, सून ह्या घरची हाय
सून ह्या घरची होणार ही पोरं
हिच्या मागं-मागं लागून
माझ्या जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं-मागं लागून
जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं-मागं लागून
जीवाला लागलाय घोर
Written by: Praniket Khune, Sandhya Keshe


