Credits

PERFORMING ARTISTS
Shankar Mahadevan
Shankar Mahadevan
Performer
Sumeet Raghvan, Urmila Kothare, Dr. Mohan Agashe, Suhas Joshi, Pushpak Shrotri
Sumeet Raghvan, Urmila Kothare, Dr. Mohan Agashe, Suhas Joshi, Pushpak Shrotri
Actor
COMPOSITION & LYRICS
Saleel Kulkarni
Saleel Kulkarni
Composer
Sandeep Khare
Sandeep Khare
Songwriter

Lyrics

ही वादळे हृदयातली देतो तुला, घेशील ना?
स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला, घेशील ना?
ही वादळे हृदयातली देतो तुला, घेशील ना?
स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला, घेशील ना?
ही पाखरे बघ चालली क्षण घेऊनी एक-एक हा
रे क्षणा, थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा
रे क्षणा, थांबना...
ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले
कण वेचले नादावुनी काही तरीही राहिले
हो, ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले
कण वेचले नादावुनी काही तरीही राहिले
जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू
या तुझ्या इवल्या मुठीतून स्वप्न हे जपशील ना?
रे क्षणा, थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा
थांबना...
बघ बोलते ना बोलताही अंतरी माया खुळी
चल भरून घेऊ चार हातांनी जिण्याच्या ओंजळी
ओ, बघ बोलते ना बोलताही अंतरी माया खुळी
चल भरून घेऊ चार हातांनी जिण्याच्या ओंजळी
देऊ किती, देऊ कसे? माझ्या खुणा, माझे ठसे
सांगना, जपशील ना तू सर्व हा माझेपणा?
रे क्षणा, थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा
रे क्षणा, थांबना, थांबना...
Written by: Saleel Kulkarni, Sandeep Khare
instagramSharePathic_arrow_out

Loading...