歌词
आनंदी आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहीकडे
आनंदी आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहीकडे
वरती-खाली मोद भरे
वायूसंगे मोद फिरे
वरती-खाली मोद भरे
वायूसंगे मोद फिरे
नभात भरला, दिशात फिरला
जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहीकडे
सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदी ही हसते आहे
सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले
गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहीकडे
वाहती निर्झर मंदगती
डोलती लतिका वृक्षतटी
वाहती निर्झर मंदगती
डोलती लतिका वृक्षतटी
पक्षी मनोहर कूजीत रे
कोणाला गातात बरे?
पक्षी मनोहर कूजीत रे
कोणाला गातात बरे?
कमल विकसले, भ्रमर गुंगले
डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहीकडे
आनंदी आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहीकडे
Written by: Shank Neel