歌詞
"ॐ नमो" हा सूर जिथे रंगतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
"ॐ नमो" हा सूर जिथे रंगतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
या सुराची महान शक्ती
नित्य आळवी भक्ती-मुक्ती
या सुराची महान शक्ती
नित्य आळवी भक्ती-मुक्ती
या सुराचा आश्रय घेता
भाव जिथे डोलतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
चराचरातुनी व्यापुनी उरला
सूर मनोहर जगा वेगळा
चराचरातुनी व्यापुनी उरला
सूर मनोहर जगा वेगळा
भक्ती रसातून भक्तजनांना
सौख्य जिथे अर्पितो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
नित्य पहाटे प्रसन्न वदने
सूर जपावा शुद्ध मनाने
नित्य पहाटे प्रसन्न वदने
सूर जपावा शुद्ध मनाने
जपता-जपता भान हरपुनी
हर्ष जिथे दंगतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
"ॐ नमो" हा सूर जिथे रंगतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
श्रीहरी नित्य तिथे नांदतो
Written by: Dashrath Pujari, Ramesh Anavkar


