歌詞
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला
कुणी न येथे भला-चांगला, जो तो पथ चुकलेला
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला
ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला
प्रिय हो ज्याची त्याला
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला
जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलीकडे
उंबरातले किडेमकोडे, उंबरीं करिती लीला
उंबरीं करिती लीला
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला
कुणा न माहीत सजा किती ते
कोठून आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते
सुटकेलागी मन घाबरते, जो आला तो रमला
जो आला तो रमला
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला
Written by: G.D. Madgulkar, Sudhir Phadke


