Kredity

PERFORMING ARTISTS
Uttara Kelkar
Uttara Kelkar
Performer
Vinay Mandke
Vinay Mandke
Performer
COMPOSITION & LYRICS
Anil Mohile
Anil Mohile
Composer
Ashok Bagve
Ashok Bagve
Lyrics

Texty

मनात माझ्या विडा रंगला
काथ-चुन्यापरी झोंबा
मनात माझ्या विडा रंगला
काथ-चुन्यापरी झोंबा
हो, मनात माझ्या विडा रंगला
काथ-चुन्यापरी झोंबा
जाऊ नका हो दूर, साजणा
काळजात या थांबा
नका मारू...
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
मनात माझ्या विडा रंगला
काथ-चुन्यापरी झोंबा
जाऊ नका हो दूर, साजणा
काळजात या थांबा
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
लवंग, विलतुड, चिकणी सुपारी
लवंग, विलतुड, चिकणी सुपारी
पान दिलं मी छान कपुरी
बहाल केली मर्जी तुम्हावरी
बहाल केली मर्जी तुम्हावरी
खुशाल तोडा विडा लवकरी
स्वप्नामधली रूपसुंदरी, मदनाची तु रंभा
स्वप्नामधली रूपसुंदरी, मदनाची तु रंभा
याच घडीला घेऊन मजला दे ना गं रसचुंबा
नको मारू...
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
रंग पानाचा ओला हिरवा
रंग पानाचा ओला हिरवा
पिवळा, केशर चुनाच गिरवा
जीव रंगला माझा, सजणा
जीव रंगला माझा, सजणा
रंग जीवाचा झेलून घ्यावा
फिरतो भवती तुझ्याचसाठी कमळावरती भुंगा
फिरतो भवती तुझ्याचसाठी कमळावरती भुंगा
भोळा-भाबळा सांब असा मी, तु माझी जगदंबा
नको मारू...
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
हो, मनात माझ्या विडा रंगला
काथ-चुन्यापरी झोंबा
जाऊ नका हो दूर, साजणा
काळजात या थांबा
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
नका मारू राजसा, प्रेमाच्या सुलट्या बोंबा
Written by: Anil Mohile, Ashok Bagve
instagramSharePathic_arrow_out

Loading...