Hudební video

Dev Devharyat Nahi with lyrics | देव देव्हाऱ्यात नाही | Sudhir Phadke
Přehrát hudební video {trackName} od interpreta {artistName}

Kredity

PERFORMING ARTISTS
Sudhir Phadke
Sudhir Phadke
Performer
COMPOSITION & LYRICS
Sudhir Phadke
Sudhir Phadke
Composer
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
Songwriter

Texty

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई? देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई? देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out