Nejlepší skladby od interpreta Anuradha Paudwal
Kredity
PERFORMING ARTISTS
Anuradha Paudwal
Performer
Ajit Kadkade
Performer
COMPOSITION & LYRICS
Shantaram Nandgaonkar
Composer
Anil-Arun
Songwriter
Texty
जय देव, जय देव जण सारे गाती
अष्टविनायका तुझी आरती
(जय देव, जय देव जण सारे गाती)
(अष्टविनायका तुझी आरती)
प्रथमेश्वर तू, गुणदायक तू
गौरीसुता तुझी गाजते कीर्ती
(जय देव, जय देव जण सारे गाती)
(अष्टविनायका तुझी आरती)
मोरगावी माझा मोरेश्वर आहे
मोऱ्या गोसावी सेवेला राहे
(मोऱ्या गोसावी सेवेला राहे)
थेऊर ग्रामी चिंतामणी तू
दर्शन माथे साऱ्या चिंता हारती
(जय देव, जय देव जण सारे गाती)
(अष्टविनायका तुझी आरती)
सिद्धटेकी सिद्धीविनायका तू
देवांना रक्षाया कैतभ वधसी तू
(देवांना रक्षाया कैतभ वधसी तू)
रांजणगावी पूजा मांडावी
सर्वेश्वर तू ऐसा महागणपती
(जय देव, जय देव जण सारे गाती)
(अष्टविनायका तुझी आरती)
ओझरचा श्रीमंत विघ्नेश्वर राजा
धावुनी येतो सत्वर भक्तांच्या ताजा
(धावुनी येतो सत्वर भक्तांच्या ताजा)
लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा
गजवदना जोजवी माता पार्वती
(जय देव, जय देव जण सारे गाती)
(अष्टविनायका तुझी आरती)
वरद विनायक वरदान देई
महाड गावा तैवी पुण्याई येई
(महाड गावा तैवी पुण्याई येई)
पाली गावच्या बुद्धीच्या तेवा
"बल्लाळेश्वर" बाप्पा तुज सारे म्हणती
(जय देव, जय देव जण सारे गाती)
(अष्टविनायका तुझी आरती)
(जय देव, जय देव जण सारे गाती)
(अष्टविनायका तुझी आरती)
(अष्टविनायका तुझी आरती)
Written by: Anil-Arun, Shantaram Nandgaonkar