Texty

तुझ्या कृपेने दिन उगवे हा तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुनी तव भजना वंदितो तुजला गजवदना वंदितो तुजला गजवदना सिंदूर वदना तुजला नमितो दर्शन दे मजला सुखकर्ता तू दुःख हरूनिया तारी प्रभो सकला विघ्न विनाशक म्हणती तुजला विघ्न विनाशक म्हणती तुजला तू आमुची प्रेरणा वंदितो तुजला गजवदना वंदितो तुजला गजवदना सर्व सुखाचा तू प्रभुदाता सर्व सुखाचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा जन जीवनी या तुच शुभकरा, शुभदिन फुलवावा कर्पूर गौरा गणनायक तू कर्पूर गौरा गणनायक तू गाऊनी तव कवना वंदितो तुजला गजवदना वंदितो तुजला गजवदना तुझ्या कृपेने दिन उगवे हा तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुनी तव भजना वंदितो तुजला गजवदना वंदितो तुजला गजवदना वंदितो तुजला गजवदना
Writer(s): Shantaram Nandgaonkar, Mohile Anil Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out