Kredity
Texty
अबीर गुलाल उधरीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडूरंग ।।1।।
उंबरठय़ास कैसे शिवू? आम्ही जाती हिन
रूप तूझे कैसे पाहू? त्यात आम्ही दीन
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ।।2।।
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निःसंग ।।3।।
आशाढी कार्तीकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळावंटी संत गोळा होती
चोखा म्हने नाम घेता भक्त होती दंग ।।4।।