Μουσικό βίντεο
Μουσικό βίντεο
Συντελεστές
PERFORMING ARTISTS
Prathamesh Laghate
Performer
COMPOSITION & LYRICS
Das Ganu
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Neha Barjatya
Producer
Στίχοι
(जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया)
(अवतरलासी भूवर जड-मूढ ताराया)
(जयदेव जयदेव)
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी
ते तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी
लीलामात्रे धरिले मानवदेहासी
जयदेव जयदेव
(जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया)
(अवतरलासी भूवर जड-मूढ ताराया)
(जयदेव जयदेव)
होऊ न देशी त्यांची जाणिव तू कवणा
करूनी "गणि गण गणात बोते" या भजना
धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना
जिकडे पाहावे, तिकडे तू दिससी नयना
जयदेव जयदेव
(जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया)
(अवतरलासी भूवर जड-मूढ ताराया)
(जयदेव जयदेव)
लीला अनंत केल्या बंकटसदनास
पेटविले त्या अग्नीवाचुनी चिलमेस
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश
जयदेव जयदेव
(जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया)
(अवतरलासी भूवर जड-मूढ ताराया)
(जयदेव जयदेव)
व्याधी वारून केले कैकां संपन्न
करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन
भवसिंधु हा तरण्या नौका तंव चरण
स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन
जयदेव जयदेव
(जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया)
(अवतरलासी भूवर जड-मूढ ताराया)
(जयदेव जयदेव)
Written by: Das Ganu


