Συντελεστές
PERFORMING ARTISTS
Manisha Joshi
Performer
COMPOSITION & LYRICS
Milind Joshi
Composer
Ashok Bagwe
Songwriter
Στίχοι
सखे ग सये गाऊया आता
आनंदाची गाणी गं
आतल्या आत पिऊन टाकू
डोळ्यातले पाणी गं
पाण्यातून त्या एक नव्याचा
फुटेल अंकुर गं
विसावयाला एक नव्याने
मिळेल माहेर गं
माहेरी जाऊन एकदा फिरून
लहान होऊया गं
धरून आईच्या बोटाला नवे
पाऊल टाकूया गं
मायेच्या गावा मळभ सारे
क्षणात विरेल गं
मनातले जे येईल ओठी
होईल सुरेल गं
तेजाची भाषा नवीन आशा
डोळ्यात हसेल गं
भल्या आडचे बुरेही तेव्हा
सहज दिसेल गं
राजहंस तो सहज ओळखी
मोत्यामधले पाणी गं
फक्त विणकरा ऐकू येती
गोठ्यामधली गाणी गं
निशब्दाच्या कुशीत अलगद
गुज नव्याचे रूजते गं
स्वागत करण्या त्याचे अन मग
सृष्टी सारी सजते गं
तुला नि मला दावील दिशा
एक स्वत: चा तारा गं
शोधून त्याला जिंकून घेऊ
खेळ हा सारा गं
Written by: Ashok Bagwe, Milind Joshi, Milind Milind

