Lyrics
तुझ्यासाठी सारे सारे तुझ्यासाठी
अता असणेही नसणेही तुझ्यासाठी
दोन देहांचे
रंग मोहांचे
एक झाले आता हे तूच मी
मीच तू
मनाला उमगले ..हा तुझा आहे ऋतू
बहरते मी कुठे ..बहरशी माझ्यात तू
कशी ही असोशी, कसा हा जिव्हाळा
भेट झाली तुझी , भेटलो मी मला
त्या क्षणी इतके कळले तूच मी , मीच तू
तुझ्यासाठी सारे सारे तुझ्यासाठी
अता असणेही नसणेही तुझ्यासाठी
दोन देहांचे
रंग मोहांचे
एक झाले आता हे तूच मी
मीच तू
Written by: Hrishikesh, Hrishikesh Saurabh Jasraj, Vaibhav Joshi

