Lyrics

दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहशी अनंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
माय-पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
तूच जन्मदेता, तूच विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
Written by: Datta Patil, Madhurkar Pathak
instagramSharePathic_arrow_out

Loading...