Créditos
ARTISTAS INTÉRPRETES
Arun Date
Intérprete
COMPOSICIÓN Y LETRA
Mangesh Padgaonkar
Letra
Yashwant Dev
Composición
Letra
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणांत
त्या सगळ्या बकुळ फुलांची...
त्या सगळ्या बकुळ फुलांची, शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
शुभ्रफुले रेखीत रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा"
शुभ्रफुले रेखीत रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा"
फुलातल्या त्या चंद्राची...
फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो मोहूनी मनात
भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो मोहूनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची...
चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती असे अंतरंगी
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती असे अंतरंगी
या उदास आभाळाची...
या उदास आभाळाची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
शपथ तुला आहे, शपथ तुला आहे
Written by: Mangesh Padgavkar, Yashwant Dev

