Crédits
INTERPRÉTATION
Anand Shinde
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Vitthal Shinde
Composition
Manwel Gaikwad
Paroles/Composition
Paroles
आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं
आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं
शेजारची ही काळी मैना
लागली डोलायला
तवा लागली डोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट
गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट
काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट
गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट
पाहुन मौका मैनेचा झोका
पाहुन मौका मैनेचा झोका
लागतोय झुलायला
कसा लागतोय झुलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जोवर नव्हती मैनेला जोडी
खायाला देतांना नाक, तोंड मोडी
जोवर नव्हती मैनेला जोडी
खायाला देतांना नाक, तोंड मोडी
राघुला पाहून, नाचून-गाऊन
राघुला पाहून, नाचून-गाऊन
डाळींब सोलायला
लागली डाळींब सोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
पोपट माझा घालतोय शीळ
मैनेची तिकडं होई तळमळ
पोपट माझा घालतोय शीळ
मैनेची तिकडं होई तळमळ
संधी ती पाहून, जाते धावून
संधी ती पाहून, जाते धावून
पिंजरा खोलायला
तो पिंजरा खोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
पोपट माझा लई-लई गुणी
साऱ्यांच्या आता तो भरलाय मनी
पोपट माझा लई-लई गुणी
साऱ्यांच्या आता तो भरलाय मनी
प्रथम आज, प्रेमाचा साज
प्रथम आज, प्रेमाचा साज
लागलाय फुलायला
आता लागलाय फुलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
जवा नविन पोपट हा
लागला मिठू-मिठू बोलायला
Written by: Manwel Gaikwad, Vitthal Shinde

