Clip vidéo
Clip vidéo
Crédits
INTERPRÉTATION
Anuradha Paudwal
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Nandu Honap
Composition
Parvin Davne
Paroles
Paroles
उठा-उठा स्वामी समर्था...
उठा-उठा स्वामी समर्था ओवाळीते पंचारती
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
(स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
(जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
परब्रम्ह आज आले भक्तांच्या समोरी
मठात या येतो आम्ही नित्य गुरुवारी
परब्रम्ह आज आले भक्तांच्या समोरी
मठात या येतो आम्ही नित्य गुरुवारी
हरपले देहभान, लागलेसे ध्यान
हरपले देहभान, लागलेसे ध्यान
शरण रे आलो आम्ही...
शरण रे आलो आम्ही, नेत्र पाणावती
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
(स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
(जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती
स्वामी समर्थांच्या पायी येतसे प्रचिती
जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती
स्वामी समर्थांच्या पायी येतसे प्रचिती
पूजेसाठी नाही काही फक्त जीव भोळा
पूजेसाठी नाही काही फक्त जीव भोळा
पामर या भक्तांसाठी...
पामर या भक्तांसाठी यावे कृपामुर्ती
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
(स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
(जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
देह आज विरुनी गेला स्वामी तुम्हा पुढती
मूर्तिमंत पाहिली मी जगणारी मूर्ती
देह आज विरुनी गेला स्वामी तुम्हा पुढती
मूर्तिमंत पाहिली मी जगणारी मूर्ती
मागणे ही सरले ध्यान लागताना
मागणे ही सरले ध्यान लागताना
स्वामी समर्थांच्या पायी...
स्वामी समर्थांच्या पायी स्वर्ग सात येती
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
उठा-उठा स्वामी समर्था...
उठा-उठा स्वामी समर्था ओवाळीते पंचारती
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी
(स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
(जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
(जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था)
(जय जय स्वामी समर्था)
Written by: Nandu Honap, Parvin Davne


