Crédits
INTERPRÉTATION
Ameya Jog
Interprète
Priyanka Barve
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Prashant Madpuwar
Paroles
Ameya Darshana
Paroles/Composition
Ameya Jog
Arrangement
PRODUCTION ET INGÉNIERIE
Ameya Jog
Production
Paroles
तुला मी मला तू...
तुला मी मला तू पुन्हा आवडावे
असे रोज काही घडावे
तुलाही मला ही नवेसे कळावे
कधी जे कळले नसावे
कधी भान हरपून जावे स्वतःचे
समोरी तुला पाहताना
कधी जाणवावे मनाचे मनाला
न काही कुठे सांगताना
पुन्हा वाटते रोज वेळी अवेळी
जिथे तू तिथे मी असावे
कधी अर्थ उमलून यावे सुगंधी
तुझ्याशी उगा बोलताना
कधी वाट बहरून जावी गुलाबी
तुझ्या सोबती चालताना
कधी वाटते रोज सांजावताना
जरा मी जरा तू झुरावे
- प्रशांत मडपुवार
Written by: Ameya Darshana, Prashant Madpuwar

