Clip vidéo
Clip vidéo
Crédits
INTERPRÉTATION
Adarsh Shinde
Interprète
Onkarswaroop
Interprète
Vinayak Pawar
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Onkarswaroop
Composition
Vinayak Pawar
Paroles/Composition
Paroles
ए, ना रे, ना
वावटळीनं पर्वताशी नीट वागावं
कोल्ह्यांनी चाखल्या मिठाला जागावं
ए, वावटळीनं पर्वताशी नीट वागावं
कोल्ह्यांनी चाखल्या मिठाला जागावं
बापाला सलाम करा, नीट जगा रे
एका सायकलिनं JCB च्या नादी लागावं
अरे, बापाला सलाम करा, नीट जगा रे
एका सायकलिनं JCB च्या नादी लागावं
अरे, कोण भितो? कोण भितो?
कोण भितो पोलादाचे दातं असल्यावर?
या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर
या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर
अरे, कोण भितो पोलादाचे दातं असल्यावर
या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर, ए
हाँ, अन मग, ए
पाण्याचा लोंढा कधी हळूच येतो का?
अन गांडुळाचा सांग कधी नाग होतो का?
ए, पाण्याचा लोंढा कधी हळूच येतो का?
अन गांडुळाचा सांग कधी नाग होतो का?
कळायाचं नाही कधी game वाजला
सिंहाचा छावा कधी गवत खातो का?
कळायाचं नाही कधी game वाजला
सिंहाचा छावा कधी गवत खातो का?
काजव्यांनी उडायाचं रात असल्यावर
काजव्यांनी उडायाचं रात असल्यावर
या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर
या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर, ए
पायाकडून नशिबाचे भोग आल्यावर
पाचोळ्याचा आटा-पिटा जाग आल्यावर
ए, पायाकडून नशिबाचे भोग आल्यावर
पाचोळ्याचा आटा-पिटा जाग आल्यावर
चोहीकडं नुसता भाऊ धुरळा उडलं
झोपलेल्या वादळाला राग आल्यावर
आरं, चोहीकडं नुसता भाऊ धुरळा उडलं
झोपलेल्या वादळाला राग आल्यावर
कोंबड्यांनी फडफडावं धार दिसल्यावर
कोंबड्यांनी फडफडावं धार दिसल्यावर
या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर
या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर
Written by: Onkarswaroop, Vinayak Pawar