म्यूज़िक वीडियो

म्यूज़िक वीडियो

क्रेडिट्स

PERFORMING ARTISTS
Anuradha Paudwal
Anuradha Paudwal
Actor
COMPOSITION & LYRICS
Saroj Nanda
Saroj Nanda
Composer
Parvin Davne
Parvin Davne
Lyrics

गाने

हे गणराया, तुला वंदिते
हे गणराया, तुला वंदिते
सप्तसुरांची फुले वाहते
हे गणराया, तुला वंदिते
तुझे रूप दिसे ठायी-ठायी रे
तुझे रूप दिसे ठायी-ठायी रे
सकल श्रुष्टी नाम तुझे नित्य घेई रे
हे गणराया, तुला वंदिते
हे गणराया, तुला वंदिते
श्वास तुझे कुसुमाना, चेतना तुझी रे
झऱ्यातूनी चरण तुझे भेटती मला रे
आदीबीज जगताचे तुच मोरया रे
महावृक्ष विश्वाचा जागला कसा रे
निल अंबरात होशी पंख रे
निल अंबरात होशी पंख रे
वारीयात वाहे तुझा शीत स्पर्श रे
हे गणराया, तुला वंदिते
हे गणराया, तुला वंदिते
दीन-कष्टी जीवांची आसवे पुसशी
दुःखहर्ता किर्तीला नित्य जागशी
नयनाने आईच्या विश्व पाहसी तु
शरणागत भक्ताला जवळ घेशी तु
करुणेला नाही तुझ्या अंत रे
करुणेला नाही तुझ्या अंत रे
समाधीत गजवदना हृदय दंग रे
हे गणराया, तुला वंदिते
हे गणराया, तुला वंदिते
सप्तसुरांची फुले वाहते
हे गणराया, तुला वंदिते
तुझे रूप दिसे ठायी-ठायी रे
तुझे रूप दिसे ठायी-ठायी रे
सकल श्रुष्टी नाम तुझे नित्य घेई रे
हे गणराया, तुला वंदिते
हे गणराया, तुला वंदिते
Written by: Parvin Davne, Saroj Nanda
instagramSharePathic_arrow_out

Loading...