Dari
PERFORMING ARTISTS
Vaishali Samant
Performer
Nilesh Moharir
Performer
Nana Patekar
Performer
COMPOSITION & LYRICS
Nilesh Moharir
Composer
Nana Patekar
Lyrics
Lirik
हिरवा हळवा पाऊस आला
हिरवा हळवा पाऊस आला
अवचित गंध...
अवचित गंध सोन्याचा झाला
हिरवा हळवा पाऊस आला
हिरवा हळवा पाऊस आला
अवचित गंध सोन्याचा झाला
हिरवा हळवा पाऊस आला, पाऊस आला
पागोळ्यातून ऊन निथळले, आ
पागोळ्यातून ऊन निथळले
चिंब पाखरू न्हाऊन गेले
पागोळ्यातून ऊन निथळले
चिंब पाखरू न्हाऊन गेले
ओल्या पाणी थेंब बिलगले
ओल्या पाणी थेंब बिलगले
अन श्रावण हिंदोळा झाला
हिरवा हळवा पाऊस आला, पाऊस आला
पानातून सांडले कवडसे
हो-हो, पानातून सांडले कवडसे
इथे आता अन आता तिथे
भरे पसा अन पुन्हा रिता हा
खेळ म्हणू की प्राक्तनये
आभाळी मेघांची झोपी
आभाळी मेघांची झोपी
अन अंधार बावरा झाला
हिरवा हळवा पाऊस आला, पाऊस आला
वळणावर सर ओसरते
वळणावर सर ओसरते
खळगीतल्या पाण्यामधले
चिमणी थोडे आभाळ पिते
अन इतकुशी मी मग होते
हरवते अन पुन्हा गवसते
आनंदाला हिरवे गोंदण
आनंदाला हिरवे गोंदण
अन श्रावण भातुकली झाला
हिरवा हळवा पाऊस आला, पाऊस आला
चिंच चोखते आंबट-चिंबत
खार पोटशी त्या फांदीवर
कोकीळ घेई तोच उखाणा
उंबरात मग लाजत-मुरडत
धावत सुटले...
धावत सुटले झुळूक होऊनी
गळाभेटीला श्रावण आला
हिरवा हळवा पाऊस आला
अवचित गंध सोन्याचा झाला
हिरवा हळवा पाऊस आला, पाऊस आला
Written by: Nana Patekar, Nilesh Moharir