album cover
Premacha Abhang
album cover
Premacha Abhang è stato pubblicato il 26 giugno 2024 da 2024 ITIHAAS STUDIOS come parte dell'album Premacha Abhang - Single
Data di uscita26 giugno 2024
Etichetta2024 ITIHAAS STUDIOS
BPM89
Melodicità
Acousticità
Valence
Ballabilità
Energia

Testi

देवेन नाव आहे त्याच
अष्टगंध, सप्तशृंग तिला पाहुनी झालो दंग
ती गोरी साधी-बोळी आणि काळा माझा रंग
छोट्याशा या काळजात कसा हा तरंग
मनीच ऐकू येतो आता प्रेमाचा अभंग
मन रंगल, हे झिंगल, चाहुल ही प्रेमाची
न कळत जुळली ही तार तुझ्या या मनाशी
आता संध्या आणि श्याम बघत बोलतो स्वतःशी
जवळ ये तू माझ्या, ना हे धीर या मनाशी
ती तुझी-माझी पहिली भेट गहिवरून गेलो
तू आली समोर माझ्या मी मंत्रमुग्ध झालो
शब्द मौन माझे झाले नि सुन्न तिथे पडलो
दिसे टिमटिम ते तारे आणि आकाशाला भिडलो
शब्द होठांवर न येत, डोळ्यात पाहून समज
छोटं प्रेमाचं ते अंकुर तुझ्या काळजात उमज
मी लाजाळूसा मुलगा तुझ्या समोर ना समज
मला खोट बोलून प्रेम करणं कधी नाही जमत
जीव गुंतला, हा बंधला प्रेमाच्या या धाग्यात
शब्द कमी पडतात प्रेमाच्या या नात्यात
मनाची ही व्यथा येते आता कागदावर उतरून
अश्रूंचे रूपांतर आता होतील मोत्यात
मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही
मला माहिती आहे की मी गरीब आहे, तुझ्या जातीचा नाही
पण मी तुला खरंच सांगतो
माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कुणीच करणार नाही
अष्टगंध, सप्तशृंग तिला पाहुनी झालो दंग
ती गोरी साधी-बोळी आणि काळा माझा रंग
छोट्याशा या काळजात कसा हा तरंग
मनीच ऐकू येतो आता प्रेमाचा अभंग
मन रंगल, हे झिंगल, चाहुल ही प्रेमाची
न कळत जुळली ही तार तुझ्या या मनाशी
आता संध्या आणि श्याम बघत बोलतो स्वतःशी
जवळ ये तू माझ्या, ना हे धीर या मनाशी
लिहितो गाणी आणि कडतात ते बोल प्रेमाचे
सुर नाही या आवाजात पण शब्द माझे या मनाचे
बहरलेल्या झाडावर रिमझिमसा पाऊस
नि ढगात दिसतात सात रंग प्रेमाचे
मनाची ही व्यथा तुला थोडक्यात सांगतो
धाडसी मी तुला पाहूनी लाजतो
प्रेमाचे दोन शब्द माझ्या होठांवर न येत
माझ्या मनाचे हे शब्द गाण्यात मांडतो
नभ दाटले हे, ओंजळीत घेतलं हे पाणी
न कळत जुडतात शब्द पडती नवी गाणी
कशी भावना ही जागे तुझ्यासाठी माझ्या मनी
हे शब्द आहेत तुझ्यासाठी आणि माझी वाणी
अष्टगंध, सप्तशृंग तिला पाहुनी झालो दंग
ती गोरी साधी-बोळी आणि काळा माझा रंग
छोट्याशा या काळजात कसा हा तरंग
मनीच ऐकू येतो आता प्रेमाचा अभंग
मन रंगल, हे झिंगल, चाहुल ही प्रेमाची
न कळत जुळली ही तार तुझ्या या मनाशी
आता संध्या आणि श्याम बघत बोलतो स्वतःशी
जवळ ये तू माझ्या, ना हे धीर या मनाशी
जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना
तर चिट्ठी लिहून उत्तर दे
नाहीतर, नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना
दोन वेण्या घालून ये
मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे
Written by: Kanishk Bhide

Loading...