クレジット
PERFORMING ARTISTS
Malati Pande
Performer
COMPOSITION & LYRICS
Anil Bharti
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Madhukar Pathak
Producer
歌詞
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
...पाहिजेस तू जवळी
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
एकटी मी दे आधार
छेड हळू हृदय तार
ऐक आर्त ही पुकार
ऐक आर्त ही पुकार
सांजवात ये उजळी, ये उजळी
...पाहिजेस तू जवळी
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
रजनीची चाहूल ये
उचलुनिया अलगद घे
पैलतिरी मजला ने
पैलतिरी मजला ने
पुसट वाट पायदळी, पायदळी
...पाहिजेस तू जवळी
...पाहिजेस तू जवळी
क्षीणले रे, मी अधीर
भवती पसरे तिमिर
व्याकुळ नयनांत नीर
व्याकुळ नयनांत नीर
मीलनाची आस खुळी, आस खुळी
...पाहिजेस तू जवळी
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
...पाहिजेस तू जवळी
Written by: Anil Bharti, Madhurkar Pathak