가사

हे, काळी धरती नांगरलेली, आली रं पेरणी धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी हा हे, काळी धरती नांगरलेली, आली रं पेरणी धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी चिंब होऊ दे धरनी रान सारं आबादानी जीव जळ खुळ्यावानी देवा किरपा करी धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी हा (हिरवाईचं दान नेसलं रान, भराला आज आलं जी) (मिरुगाच्या नादानं केली पेरन, जोमानं बरसू दे पानी) काळ्या आईची करनी तिला लेकराची माया माय होईल हिरवी गान हिरीताच गाया वरती आभाळाची हाये मला बापावानी छाया साद माझ्या काळजाची न्हाई जायची रं वाया माझ्या जीव्हाराचं सोन, येऊ दे रं अवदाच्यानं घाली पदरात दान, देवा किरपा करी धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी (हिरवाईचं दान नेसलं रान, भराला आज आलं जी) (मिरुगाच्या नादानं केली पेरन, जोमानं बरसू दे पानी) हे बीज रुजलं रुजलं माउलीच्या उदरात माझं शिव्हार आवार आज आलंया भरात सात जन्माची पुण्याई घातली तू पदरात माय भरल्या खुशीनं गोडं हसते गालात आलं डोळ्यामंदी पानी, जीव झाला खुळ्यावानी सारी तुझीच करणी, देवा किरपा करी धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी
Writer(s): Ajay-atul, Guru Thakur Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out