Songteksten

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी हरवली वाट दिशा अंधारल्या दाही ववाळुनी उधळतो जीव मायबापा वनवा ह्यो उरी पेटला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला, देवा खेळ मांडला (सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा) (तूच वाट दाखीव गा खेळ मांडला) (दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्हा हुबा) (ह्यो तुझ्याच उंबऱ्यात, खेळ मांडला) हे, उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई भेगाळल्या भुईपरी जीनं अंगार जीवाला जाळी बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे करपलं रान देवा, जळलं शिवार तरी न्हाई धीर सांडला खेळ मांडला
Writer(s): Ajay Atul, Guru Thakur Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out