Songteksten

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला मी न छळावे त्यांना, त्यांनी छळू नये मजला मी न छळावे त्यांना, त्यांनी छळू नये मजला बधिरतेच्या... बधिरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो आता-आता छाती केवळ भीती साठवते डोंगर बघता उंची नाही, खोली आठवते आता-आता छाती केवळ भीती साठवते डोंगर बघता उंची नाही, खोली आठवते आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी आता नाही रात्रही उरली पुरवीगत हौशी आता नाही रात्रही उरली पुरवीगत हौशी बिलंदरीने... बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा दारी नाही फिरकत कुठला नवा छंद-चाळा दारी नाही फिरकत कुठला नवा छंद-चाळा राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा कंटाळ्याचा... कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
Writer(s): Sandeep Khare Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out