Songteksten

दूरदेशी गेला बाबा दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई नीज दाटली डोळ्यांत नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा कसा चिमणासा जीव कसाबसा रमवला चार भिंतीत धावून दिसभरं दमवला कसा चिमणासा जीव कसाबसा रमवला चार भिंतीत धावून दिसभरं दमवला आता पुरे, झोप सोन्या कुणी म्हणतच नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी? कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी? कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही दार उघडून परि तिथे धावायचे नाही दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही दार उघडून परि तिथे धावायचे नाही फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा
Writer(s): Salil Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out