Letra

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात धरेवरी अवघ्या फिरलो धरेवरी अवघ्या फिरलो निळ्या अंतराळी शिरलो निळ्या अंतराळी शिरलो कधी उन्हामध्ये न्हालो कधी चांदण्यात, कधी चांदण्यात एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात फुलारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे राणी, नाचे राणी फुलारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे राणी, नाचे राणी तुझ्या मनगटी ही बसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात मुका, बावरा मी भोळा, पडेन का तुझिया डोळा मुका, बावरा मी भोळा, पडेन का तुझिया डोळा मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात? तुझ्या मंदिरात एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात
Writer(s): G D Madgulkar, Vasant Pawar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out