Создатели
ИСПОЛНИТЕЛИ
Asha Bhosle
Исполнитель
Ravindra Sathe
Исполнитель
МУЗЫКА И СЛОВА
Anil Mohile
Композитор
Vivek Apte
Автор песен
Слова
मनमोहना तू राजा स्वप्नातला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
चल ये राजसा, कसा लाभला एकांत हा तुला-मला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
आज रूप हे गोड तुझे ना भरवसा उद्याचा
खेळ तुझा प्रेमाचा घेईल जीव हमालाचा
मनमोहना तू राजा स्वप्नातला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
कसे भुलावे सांग मला तू सप्तसुरांचे गाणे
सूर आपला जुळता कसली धुंद होऊनी जाणे
ना असा होई गंधर्व कधी ही मूर्ख गाढवाचा
खेळ व्हायचा तुझा, जायचा जीव हमालाचा
मनमोहना तू राजा स्वप्नातला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
मी ताल-लईच्या जगात तुजला नेते
मी ताल-लईच्या जगात तुजला नेते
चल टाक पाउले, नृत्य तुला शिकविते
मोर पिसेला उन होई का मयूर कावळ्याचा
खेळ व्हायचा तुझा, जायचा जीव हमालाचा
मनमोहना तू राजा स्वप्नातला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
हवा कशाला सरस्वतीचा अलंकार भाषेचा
शब्द येऊ दे ओठांवरती मनात या प्रेमाचा
सहजपणे साकार होवू दे प्रेमभाव मनीचा
कशास आता अभिनय खोटा हसण्या-रडण्याचा
आमच्या रडण्या-हसण्याचा हा खेळच श्रीमंतीचा
खेळ व्हायचा तुझा, जायचा जीव हमालाचा
मनमोहना तू राजा स्वप्नातला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
चल ये राजसा, कसा लाभला एकांत हा तुला-मला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
मनमोहना तू राजा स्वप्नातला
Written by: Anil Mohile, Vivek Aapte