Слова

होणार होताला, जाणार जाताला, मागे तू फिरू नको उगाचं सांडून खऱ्याची, संगत खोट्याची धरू नको हो, होणार होताला, जाणार जाताला, मागे तू फिरू नको उगाचं सांडून खऱ्याची, संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसा, जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा, इसार गजाल कालची रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे (सोबती रे तू तुझाचं अन तुला तुझीचं साथ) (शोधूनी तुझी तू वाट, चाल एकला) (होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर?) (रात संपता पहाट होई रे पुन्हा) हो, देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे ओ, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपान गाठीला, धरत वेठीला, कशी रं सुटावी आशा? हो-हो, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपान गाठीला, धरत वेठीला, कशी रं सुटावी आशा? अवसेची रात नशिबाला, पुनवेची गाठ पदराला होईल पुनव, मनाशी जागव, खचूनी जाऊ नको येईल मुठीत तुझ्याही आभाळ, माघार घेऊ नको उगाचं भयाण वादळ-वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साद घाली दिस उद्याचा नव्याने, इसार गजाल कालची रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे (सोबती रे तू तुझाचं अन तुला तुझीचं साथ) (शोधूनी तुझी तू वाट, चाल एकला) (होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर?) (रात संपता पहाट होई रे पुन्हा) हो, देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे
Writer(s): Guru Thakur, Vijay Narayan Gavande Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out