Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Performer
COMPOSITION & LYRICS
Nandu Honap
Nandu Honap
Composer

Lyrics

आई-बापाहुन मायाळू या
साईबाबाला विसरू नका
आई-बापाहुन मायाळू या
साईबाबाला विसरू नका
तो नाथ असे या अनाथांचा
ह्या नाथाला विसरू नका
आई-बापाहुन मायाळू या
साईबाबाला विसरू नका
तो देतो तुम्हा सर्व काही
स्वतःसाठी कधी ना मागितले
तुम्हा जे-जे हवे ते त्याने दिधले
कधी काही उडे नाही केले
ज्या हातांनी घेता तुम्ही
ते हात कुठे पसरू नका
आई-बापाहुनी मायाळू या
साईबाबाला विसरू नका
त्या दगडावरती बैसुनिया
तो देई निवारा आपल्याला
धरी छाया भक्तावर आपली
ऊन, वारा जरी लागे त्याला
जरी धरणी सारी हादरली
म्हणे, "भक्तांना हादरू नका"
आई-बापाहुनी मायाळू या
साईबाबाला विसरू नका
त्याच्या पोटाला असले, नसले
भक्तांच्या पोटाची चिंता
तो आहे भुकेला भक्तीचा
तो सर्वांचा आहे दाता
तुम्हा काय हवे ते सांगाया
आणि मागाया कचरू नका
आई-बापाहुनी मायाळू या
साईबाबाला विसरू नका
त्याने डौल कधी नाही केला
ना थाट कधी केला भारी
अलंकार रहित राहून त्याने
ही नटविली दुनिया सारी
श्रद्धा-सबुरी हे ज्ञान दिले
अज्ञान बनून बिखरू नका
आई-बापाहुन मायाळू या
साईबाबाला विसरू नका
तो नाथ असे या अनाथांचा
ह्या नाथाला विसरू नका
ज्या दृष्टीने न्हाहाळाल तुम्ही
त्या दृष्टीने पाहिल तुम्हा
ज्या आस्थेने शोधाल तुम्ही
त्या आस्थेने शोधील तुम्हा
अवलंब करा त्या प्रगतीचा
हरेन्द्रासम घसरू नका
आई-बापाहुन मायाळू या
साईबाबाला विसरू नका
तो नाथ असे या अनाथांचा
ह्या नाथाला विसरू नका
साईबाबाला विसरू नका
Written by: Nandu Honap
instagramSharePathic_arrow_out

Loading...