album cover
Airaneechya Deva Tula
album cover
Airaneechya Deva Tula was released on February 8, 2022 by Saregama as a part of the album Shradhanjali Lata Ji
February 8, 2022
LabelSaregama
BPM
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं, धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर-खाली
लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर-खाली
इडा-पिडा जाईल आली, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग
किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली-बुरी
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसल घावावरी, सोसायाला, झुंजायाला अंगी बळ येऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
Written by: Anandghan, Jagdish Khebudkar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...