Lyrics
जग भासते सारे नवे-नवे
बरसे जसे हळूवार चांदणे
हो, भुलवी मला हे भोवती असणे तुझे
बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू
बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू
का मनाला ओढ लावी गोड हूरहूर ही?
राहिली ओठावरी ते बोलू नजरेतूनी
का मनाला ओढ लावी गोड हूरहूर ही?
राहिली ओठावरी ते बोलू नजरेतूनी
पाहिले स्वप्न जे आज झाले खरे
रोमरोमांतूनी प्रेम हे मोहरे
सोसवे ना आता दोघातली दूरी
आतूर मी, का दूर तू? ये साथ दे
बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू
बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू
त्या क्षणाची ओढ सारी कळले हे मला
बावरे मन सावरू दे, थांबना रे जरा
त्या क्षणाची ओढ सारी कळले हे मला
बावरे मन सावरू दे, थांबना रे जरा
नवनवे बंध हे जोडूया प्रीतीचे
खुलवूया रंग ते एकमेकांतले
सोसवे ना आता दोघातली दूरी
आतूर मी, का दूर तू? ये साथ दे
बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू
बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू
Written by: Avinash Shripad Chandrachud, Avinash-Vishwajeet, Mandar Cholkar, Vishwajeet Madhav Joshi