album cover
Mi Marathi
Hip-Hop
Mi Marathi was released on August 1, 2025 by Songdew as a part of the album Mi Marathi - Single
album cover
Release DateAugust 1, 2025
LabelSongdew
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM111

Credits

PERFORMING ARTISTS
SPARKK
SPARKK
Performer
Shubham Durgule
Shubham Durgule
Performer
Vipul Kadam
Vipul Kadam
Performer
COMPOSITION & LYRICS
Shivprasad Kalyankasture
Shivprasad Kalyankasture
Composer

Lyrics

Hey, गवताच्या पात्यात डोलतो, रगताच्या नात्यात बोलतो
गवताच्या पात्यात डोलतो, रगताच्या नात्यात बोलतो
या मातीच्या उरात धडधडतो हा रांगडा छावा
मी मराठी, मराठी, मराठी भावा
मी मराठी, मराठी, मराठी (रांगडा रुबाब)
मी मराठी, मराठी, मराठी भावा
मी मराठी, मराठी, मराठी
SPARKK
मराठी झेंडा अन् तख्त मराठी
मराठी घाम, रक्त मराठी
इंग्रजी बोलतो मी फाड-फाड-फाड
पण मनाच्या गाभाऱ्यात फक्त मराठी
मी भक्त मराठी तडफदार
मराठी जिभेला चटक नाद
पिझ्याला कोलती पुरणपोळी
सोड बिर्याणी, दे मला वरण-भात
कडक फार पोरी मराठी
त्यांच्या नाकावर नथीचा कडक साज
एकाच नजरत सरळ ठार
तिच्या नववारी नक्षीला कडक धार
मराठी पोरं कमी नाही, bro
एकाचं लफडं अन् धावतो गाव
बापाच्या नावाचा कारभार सारा
म्हणून बापाच्या नावापुढं लावतो राव
या सह्याद्रीच्या आभाळात विज कडाडणारी मराठी
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जगात भारी मराठी
मी मराठी, मराठी, मराठी भावा
मी मराठी, मराठी, मराठी
मी मराठी, मराठी, मराठी भावा
मी मराठी, मराठी, मराठी
आपलं दैवत शिवाजीराजे भौ
जगभर जगदंब गाजे भौ
गुलामीच्या ढुंगणावर घातली लाथ
म्हणून मराठी असल्याचा माज ए भौ
आज आहे भौ तुझ्या आसपास शिकल्या-सवरलेल्या बायकांचा मोठा ढीग
पण १८०० मध्ये हा नव्हता scene
म्हणून बदलायला scene या समाजाचा एक मराठी जोडपं झटलं होतं
मुलींची शाळा काय गुन्हा व्हंय?
पण या कर्मठ समाजाने सावित्री-ज्योतीच्या नावावर लादलेलं खटलं होतं
उठलं होतं जवा परकं लोक आपल्या मुंबईची मराठी गाडायला
आली मातोश्रीवरून एक डरकाळी
वाघांना शिकवू नका फाडायला
म्हणून मत भले कोणत्याही पक्षात ठेव
पण बाळासाहेब ठाकरेंना लक्षात ठेव
या भारताची लोकशाही सगळ्यात मोठी
आणि संविधान हाय तिच्या पाठीचा कणा
बुद्धीच्या बळावर भीमानं मोडलाय
भेदभाव करणाऱ्या जातीचा कणा
लतादीदी आपल्या एक नंबर
सचिनचे शंभरदा शंभर
लावला रं, लावला की अजय-अतुल
नाचू दे, तुटू दे कंबर
अशी हिऱ्यांनी-पिऱ्यांनी जडलेली-घडलेली चकाकणारी मराठी
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जगात भारी मराठी
मी मराठी, मराठी, मराठी भावा
मी मराठी, मराठी, मराठी
मी मराठी, मराठी, मराठी भावा
मी मराठी, मराठी, मराठी
मराठी माणसाला भाऊबंदकीचा शाप आहे
आरं आपली कुळं विसरू नका
दुनिया हिंडा, दुनिया फिरा
पण आपली मुळं विसरू नका
Written by: Shivprasad Kalyankasture
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...