album cover
Shala De
album cover
Shala De was released on January 2, 2026 by Chalchitra Sangeetwale as a part of the album Krantijyoti Vidyalay - Marathi Madhyam (Original Motion Picture Soundtrack) - EP
BPM77
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

पुन्हा हात जोडू दे, प्रार्थना ही गाऊ दे
खरा धर्म कळो आता, समतेचं भान दे
तोच सूर ओठी दे, तोच नाद कानी दे
फुल-फुल उमलूनी, वेल सारी बहरू दे
उजळावी एक ज्योत तिमिराच्या सामोरी
चेतनेला जाग द्यावी दुर्गुणाला सारुनी
विहरावी गगनात मुक्त सारी पाखरे
हाक देती तुला आता दारी उभी लेकरे
पुन्हा धाव घेऊ दे ना, गाभाऱ्याला येऊ दे
माझ्या प्रार्थनेला आता बळ दे
माझी म्हणायाला माझी शाळा दे
हाती हात दे, तुझी साथ दे
चालू सोबतीनं पायी वाट दे
माझ्या प्रार्थनेला आता बळ दे
माझी म्हणायाला माझी शाळा दे
पाहू दे नव्याने मंदीराची पायरी
सावली धरावी ओंजळीने, माऊली
विसरूनी देहभान अंगणात खेळू दे
हरपूनी चिंता सारी आनंदात न्हाऊ दे
नवी एक पहाट गं, तुच आता दान दे
क्रांतिज्योती तुझ्या हाती ज्योत नवी पेटू दे
पुन्हा धाव घेऊ देना, गाभाऱ्याला येऊ दे
माझ्या प्रार्थनेला आता बळ दे
माझी म्हणायाला माझी शाळा दे
हाती हात दे, तुझी साथ दे
चालू सोबतीनं पायी वाट दे
माझ्या प्रार्थनेला आता बळ दे
माझी म्हणायाला माझी शाळा दे
Written by: Harsh-Vijay, Ishwar Andhare
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...