Şarkı sözleri

नभी उधळला, उभ्या अंगात भिनला उर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल हा ताशा कडाडला, असा ढोल धडाडला कसा जलोष वाढला? मनी उल्लास भरला नवा जणू रक्त पुष्पापरी देह रंगला तुझ्या नामघोषात हा जीव दंगला नाद निनादला रे मोरया नाद निनादला (नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया) (नाद निनादला रे मंगलमूर्ती मोरया) (नाद निनादला रे मोरया नाद निनादला) शिवगवरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना भावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझ्या एकदंता गणा पार करशी मनोकामना सान थोर गाती तुझा थाट आगळा भाव जाई ओसंडूनी काळजातला नाद निनादला रे मोरया नाद निनादला (नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया) (नाद निनादला रे मंगलमूर्ती मोरया) (नाद निनादला रे मोरया नाद निनादला) होई चिंता निवारणी देवा तुझ्याच कारणी नाही साऱ्या जगी या तुझ्यासारखा रे सखा तूच चिंतामणी येशी जनताच्या तारणी करण्या भक्त उधारणी बळ तुझ्या कृपेच्या प्रसादाचं दे गणराया तू ये धावुनी घालवूनी महिमा मुखी कंठ दाटला घुमे आसमंती मनी उरी साठला नाद निनादला रे मोरया नाद निनादला (नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया) (नाद निनादला रे मंगलमूर्ती मोरया) (नाद निनादला रे मोरया नाद निनादला)
Writer(s): Samir Saptiskar, Sandeep Patil Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out