Şarkı sözleri

गाठी गं गाठी गं जुळतं का नातं साता जन्माचा? स्वर्गात पडती (गाठी गं) दिस जरा वाई गं, सोन्याचा होई गं, होतात चांदीच्या राती गं जगणं अवघं बदलून जाई कसं, जगण्याला येई गोडी मोठी गं हे सुख गं, सुख गं, सुख गं, सुख गं, सुख, सुख, सुख, सुख लहरे गं आभाळी उनाड, मन माझं वाऱ्याचं गं निसटे गं हातून अल्लद मन माझं पाऱ्याचं गं थोडी-थोडी करतेय का खोडी? थोडी-थोडी करी मनमानी थोडं-थोडं धीट गं हे होई, थोडं-थोडं गोंधळून जाई मन आपल्याच मस्तीत, आपल्याच धुंदीत वाहे गं (जुळली गाठ गं, सजली वाट गं) (जुळली गाठ गं, सजली वाट गं) (जुळली गाठ गं, सजली वाट गं) (जुळली गाठ गं, सजली वाट गं) रंग हे ओले लाविले डोळ्यांनी त्याने किती ह्या जीवाला माझे डोळे घडी-घडी कसे ठाई-ठाई पाही त्याला मनात माझ्या त्याच्याचं स्वप्नांच्या वाटा, त्याच्याचं आशा गं माझ्या उरी येईना या मना काही त्याचा विना राहू मी सांग ना कशी दाटे उरात का हुरहुर ही अशी? सनईचे घुमले सूर दारी, आली बाई सजणाची स्वारी घडीला ह्या साखरेची गोडी, सुख मावेना गं बाई उरी फिटे हौस डोळ्यांची, घडी ही सोन्याची आली गं (जुळतं का नातं साता जन्माचा? स्वर्गात पडती) (दिस जरा वाई गं, सोन्याचा होई गं, होतात चांदीच्या राती गं) (जगणं अवघं बदलून जाई कसं, जगण्याला येई गोडी मोठी गं) (हे सुख गं, सुख गं, सुख गं, सुख गं, सुख, सुख, सुख, सुख) (जुळली गाठ गं, सजली वाट गं) (जुळली गाठ गं, सजली वाट गं) (जुळली गाठ गं, सजली वाट गं) (जुळली गाठ गं, सजली वाट गं)
Writer(s): Vaibhav Deshmukh, Av Prafullachandra Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out