音乐视频

Ram Janmala Ga Sakhi with lyrics | राम जन्मला ग सखी | Sudhir Phadke | G. D. Madgulkar | Ram Bhajan
观看 {artistName} 的 {trackName} 音乐视频

制作

出演艺人
Sudhir Phadke
Sudhir Phadke
主唱
Abhimanyu-Pragya
Abhimanyu-Pragya
混音师
作曲和作词
Sudhir Phadke
Sudhir Phadke
作曲
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
词曲作者

歌词

प्रसवतील त्या तिन्ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान हे यज्ञपुरुषाचे वचन खरे ठरले या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या यथाकाली त्या प्रसूत झाल्या कौसल्येला श्री राम, सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रूघन आणि कैकयीला भरत असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले राजाची इच्छा पूर्ण झाली प्रासाधातील सुखाला सीमाच राहिल्या नाही नगरजानांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता श्री रामाधिग भावंड रांगू लागली, तरीही अयोध्यातील स्त्रिया श्री राम जन्मच आनंद गीतचं गात होत्या पुन्हा-पुन्हा गात होत्या चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला गं सखी, राम जन्मला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) कौसल्या राणी हळूं उघडी लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी, धेनू अंगणी दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या 'काय काय' करित पुन्हा उमलल्या खुळ्या उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी, पोंचली जनी गेहांतुन राजपथी धावले कुणी? धावले कुणी? युवतींचा संघ एक गात चालला युवतींचा संघ एक गात चालला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) पुष्पांजली फेकी कुणी, कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द, भाषणे वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) वीणारव नूपुरांत पार लोपले, पार लोपले कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले, अधिक तापले बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती गगनांतुन आज नवे रंग पोहती मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) बुडून जाय नगर सर्व नृत्यगायनी, नृत्यगायनी सूर, रंग, ताल यात मग्न मेदिनी, मग्न मेदिनी डोलतसे ती ही, जरा शेष डोलला डोलतसे ती ही, जरा शेष डोलला (राम जन्मला गं सखी, राम जन्मला) (राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
Writer(s): Sudhir V Phadke, G D Madgulkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out