制作
出演艺人
Kiran Rao
表演者
Ajay Gogavale
表演者
Aamir Khan
演员
Fatima Sana Shaikh
演员
Jitendra Joshi
演员
Rinku Rajguru
演员
Sai Tamhankar
演员
Sonali Kulkarni
演员
Sunil Barve
演员
Tanaji Galgunde
演员
作曲和作词
Ajay-Atul
作曲
Guru Thakur
作词
歌词
एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया
एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया
भेगाळ माय मातीच्या ह्या
डोळ्यात जागलिया आस
घेऊन हात हातामंदी
घेतला लेकरांनी ध्यास
Hey, लई दिसानी भारल्यावानी
शिवार झालंया
एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया
Hey, पिचलेला, इझलेला टाहो
कधी ना कुणा कळला
तळमळलीस तू करपुनी
हिरवा पदर तुझा जळला
छळ केला पिढीजात तुझा गं
उखडून वनराई
अपराध किती झाले पण आता
शरण तुला आई
(नभ पाझरता दे जलधन सारे)
(बिलगु तुझ्या ठायी)
(बघ परतून आता)
(हिरवा शालू देऊ तुज आई)
उपरतीनं आलिया जाण
जागर झालंया
एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया
ओ, जरी रुजलो उदरात तुझ्या
कुशीत तुझ्या घडलो
स्वार्थाचे तट बांधत सुटलो
अन वैरी तुझे ठरलो
चालवूनी वैराचे नांगर
नासवली माती
छिन्न तुझ्या देहाची ही चाळण
उरली आता हाती
(आम्ही हाल उन्हाचे मिटवू सारे)
(आज तुझ्या पायी)
(बघ परतून आता)
(हिरवा शालू देऊ तुज आई)
Hey, उपरतीनं आलिया जाण
जागर झालंया
एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
Hey, काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया
भेगाळ माय मातीच्या ह्या
डोळ्यात जागलिया आस
घेऊन हात हातामंदी
घेतला लेकरांनी ध्यास
Hey, लई दिसानी भारल्यावानी
शिवार झालंया
एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया
Written by: Ajay-Atul, Ajayatul, Guru Thakur