制作
出演艺人
Ajay Gogawale
表演者
作曲和作词
Swapnil Godbole
作曲
Mandar Cholkar
词曲作者
歌词
कळंना काही, ह्यो कशापाई?
करपला जल्म सारा
वावटळ ही जिंदगीची
कुठं दिसंना निवारा
हे, कळंना काही, ह्यो कशापाई
करपला जल्म सारा
वावटळ जिंदगीची
कुठं दिसंना निवारा
फाटलेल्या नशिबाला किती लावू ठिगळं
आटलेल्या ईहिरीच्या बी डोळ्यांमंधी आभाळ
कल्लोळ, ह्यो कल्लोळ, उरात ह्यो कल्लोळ
उरात ह्यो कल्लोळ
हे, हारवून गेलं सुखाचं सपानं
पुनवंचं चांदणं पेटलं
बदललं सारं जगाचं वागणं
नात्यात बी कुंपन घातलं
मायेच्या या पदरात टोचतिया बाभळ
आटलेल्या ईहिरीच्या बी डोळ्यांमंधी आभाळ
कल्लोळ-कल्लोळ, उरात ह्यो कल्लोळ
लाजला, माजला ह्यो कल्लोळ
श्री गणेश
Written by: Mandar Cholkar, Swapnil Godbole

