音乐视频

制作

出演艺人
Milind Ingle
Milind Ingle
表演者
作曲和作词
Milind Ingle
Milind Ingle
作曲

歌词

मुसळधार पाऊस, खिडकित उभी राहुन पहा बघ माझी आठवण येते का? हाथ लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलसं तळं पिउन टाक, बघ माझी आठवण येते का? वाऱ्यानं उडणारे पावसाचे चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पाया खालून, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचुन घे, चालत रहा पाऊस थांबे पर्यंत, तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकित ये, आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढेल, तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हण घर गळतय, मग चहा कर, तो ही घे, तो उठून पंकज उदास लाविल, तू तो बंद कर, किशोरीचं सहिलारे लाव, बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तू ही तसंच म्हण, विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशिवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरु नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशी खाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात, एक दिवस तरी, बघ माझी आठवण येते का? पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा दारास भास आता, हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा, पाऊस दाटलेला गवतास थेंब सारे, बिलगून बैसलेले गवतास थेंब सारे, बिलगून बैसलेले निथळून साचलेले, निथळून साचलेले तळवा भीजेल आता, हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा, पाऊस दाटलेला झाडावरुन पक्षी, सारे उडुन गेले झाडावरुन पक्षी, सारे उडुन गेले जेव्हा भिजून गेले, जेव्हा भिजुन गेले, पंखात नाद त्यांच्या हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला पाउलवाट सारी, रात्री भिजुन गेली पाउलवाट सारी, रात्री भिजुन गेली विसरुन तीच गेली, विसरुन तीच गेली ओला ठसा कुणाच्या, हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा दारास भास आता, हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला
Writer(s): Saumitra, Milind Madhav Ingle Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out